शिवसेनेच्या डेडलाईनचं काय झालं ? निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर द्यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी पीक विमा कंपन्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. अन्यथा १५ दिवसांनी पुन्हा मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

मात्र प्रत्यक्षात आजही अनेक शेतकरी पीक विमा आणि कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्वीट करून शिवसेना पक्ष प्रमुखाला परत एकदा आम्ही विमा कंपन्यांना दिलेल्या deadline बद्दल आठवण करून देतो. पुरावा देणार असाल तर असा द्या म्हणजे महाराष्ट्राला खरं खोटं कळेल. ही बँक स्टेटमेंट २०१८ ची आहे, उद्धवनी ४०० कोटी शेतकऱ्यांना मिळून दिले असतील तर ४००  कोटीचे बँक स्टेटमेंट जाहीर करावेत. अस ट्वीट केले आहे.

दरम्यान, शिवसेना जवळपास गेल्या पाच वर्षांपासून सत्तेमध्ये सहभागी आहेत. तरीही शेतकरी प्रश्नांसाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागत हे दुर्दैव आहे. कारण सत्ता असताना शिवसेना रस्त्यावर उतरली होती त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

विश्वनाथ म्हाडेश्वारांवर तत्काळ 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा : रुपाली चाकणकर

कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल – शिवसेना 

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल