सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला आहे.

यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही. पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं, असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Loading...

 

“शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्याच्यासाठी बंद करणे. हे जरा चुकीचे वाटत. यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली येथे जात असून त्याच दिवशी बंदची हाक देणं योग्य नसल्याचेही सुळे यांनी सांगितले. “संजय राऊत यांनी काल त्यांचे शब्द मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावरून सध्या राज्यात वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण