कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार रत्नागिरीत टिकता कामा नये : निलेश राणे

Nilesh Rane

रत्नागिरी : शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याहस्ते शनिवारी रत्नागिरीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे?
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच.मागील काही घडामोडीमध्ये एकटा नीलेश राणे विरूद्ध अख्खी शिवसेना असे चित्र होते. मात्र, शिवसेना माझे काहीही करू शकले नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा चार दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच, अशी शपथ आपण घेतली आहे.