fbpx

मातोश्रीच्या कुठल्या माळ्यावर काय-काय व्हायचं आम्हाला माहित आहे – निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कडव्या शब्दांत डिवचले आहे. मी बाळासाहेबांवर टीका केली. वाटलं होतं शिवसैनिक चवताळतील, पेठून उठतील. अंगावर येतील, पण तसं काहीच झालं नाही. सगळे हिजडे निघाले, एकाच्यात दम नाही, अशा शब्दात माजी खासदार आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. राणेंच्या नादाला लागलात तर मातोश्रीच्या माळ्यावर काय काय चालायचे ते उघड करेन, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

पूर्णगड येथे आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केले. रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गट पूर्णगड येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश मेळावा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. या मेळाव्यात असंख्य शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.