‘संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं,एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला’

sanjay raut

मुंबई – बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी 2903 मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर मात केली.

सुरुवातीचा 45 फेरीअखेर मंगला अंगडी यांची आठ ते दहा हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर काँग्रेस सतीश जारकीहोळी यांची आघाडी होत गेली. शेवटच्या सहा फेऱ्या राहिल्या असताना जारकीहोळी हे सुमारे 400 ते 500 मताने आघाडी घेतली होती. त्यानंतर अचानकपणे या निवडणुकीला कलाटणी मिळाली. अखेर काँग्रेसवर भाजपच्या मंगल अंगडी यांनी 2903 मतांनी मात करीत विजय संपादन केला.

या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 642 मते मिळाली.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या  प्रचारासाठी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. खासदार संजय राऊत हे स्वतः त्याठिकाणी प्रचाराला गेले होते. आता निवडणुकीत शुभम शेळके यांचा पराभव झाल्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.

संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेने जे मुंबईत मराठी माणसासोबत केलं तेच बेळगावात केलं. एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला आणि मराठी माणसाची समिती कमजोर केली. आता पुढच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडे बघणार नाही असं ट्वीट त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या