या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे; निलेश राणेंचा घणाघात

या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे आमदार राजू नवघरे हे त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले. त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला.

या अतिशय निंदनीय प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आता  या प्रकरणावरुन नवघरे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, भाजपनेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून त्यांच्यावर अतिशय जहरी टीका केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे असं राणे म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या