तर अजित पवारांचे संध्याकाळचे कार्यक्रम जाहीर करू – निलेश राणे

ncp leader ajit pawar and nilesh rane

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी यापुढे नारायण राणेंचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांचे रात्रीचे कार्यक्रमच जाहीर करणार असल्याचा थेट इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मराठवाड्यात सुरु असणाऱ्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता निलेश राणे यांच्याकडून पवारांच्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे.

नारायण राणे यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. त्यांना फडणवीस सरकारने मंत्रीपदाचे गाजर दाखवले मात्र आता मंत्रीपद मिळेना म्हणून राणे हताश झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

पवार आडनाव काढा, तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रासुद्धा विचारणार नाही- निलेश राणे
राणेसाहेबांनी जे काही मिळवले आहे. ते आपल्या कर्तुत्वावर मिळवले आहे. तुम्ही पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रसुद्धा विचारणार नाही या शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. अजित पवारांनी कधीच मराठा समाजाची बाजू घेतली नाही. आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं असं कधी बोलले नाही. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयांवर ठाम भूमिका अजित पवारांनी कधी घेतली नाही. 15 वर्षात सिंचन महाराष्ट्रात फक्त 2 टक्क्यावर ठेवलं… धरण भरणारे दादा म्हणत एकापाठोपाठ एक ट्विट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.