‘मुंबईला स्विमिंग पूल करणाऱ्या शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे’

niulesh rane vs kishori pednekar

मुंबई-  मुंबईतील मोठ्या नाल्यांतील १०४ टक्के गाळ उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र पहिल्याच पावसात या दाव्याची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. याशिवाय कामावर निघालेल्यानोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्यापावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्येअनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

या पार्श्वभूमीवर आताविरोधकांना सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.भाजप नेते निलेशराणे यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 100 टक्के नालेसफाई झालीअसा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. मात्र आज हे चित्र आहे.दरवर्षी मुंबई शहराला स्विमिंग पूल करण्याचं काम जो पक्ष 25 वर्ष करतोय त्याशिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे. वाट लावलीमुंबईची असे राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल रात्रभर पावसाने मुंबईला चांगलेच झोडपलेआहे. हा पाऊस अद्यापही मुंबईच्या अनेक भागांत बरसत आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरेम्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस होत आहे. तर मुंबईच्यापूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदारसरीही कोसळत आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP