शिवसेनावाल्यांची मस्ती जिरवलीच पाहिजें : निलेश राणे

मुंबई:राज्यभर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.परिणामी राज्यभर बर्याच ठिकाणी झालेल्या प्रचंड नुकसानाची दखल सुद्धा शिवसेनेचे मुखपत्र म्हणवणाऱ्या ‘ सामना ‘ या वृत्तपत्राने अग्रलेखाच्या माध्यमातून घेऊ नये हे खुपचं क्लेशकारक असल्याचे म्हणतआता या शिवसेना वाल्यांची मस्ती जिरवली पाहिजे असं ट्वीट सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे.

निलेश राणे आणि शिवसेना यांचा संबंध म्हणजे खुपचं गंभीर प्रकरण; काय म्हणाले निलेश राणे पाहूया त्यांच्याच शब्दात:

आताची शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालं, लोकांची घरं, गुरं, शेती वाहून गेली. शेतकऱ्यांचे किती नुकसान झालंय हे सांगता ही येणार नाही पण त्यावर अग्रलेख लीहावासा नाही वाटला. ह्यांची मस्ती जिरावलीच पाहिजे.

त्याचबरोबर राणेंनी बॉलीवूड प्रकरणावर सुद्धा शिवसेनाला चांगलेच फैलावर घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-