fbpx

“मूळव्याधची औषधे घ्या.. बरं वाटेल..” निलेश राणे यांचा शिवसेनेला सल्ला

मुंबई : “केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत. अच्छे दिनाचा चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत देश आहे.” अस म्हणत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला आहे.

पण यावर भाजपच्या वाटेवर असणाऱ्या राणे कुटुंबाची प्रतिक्रिया आली नाही तर नवलच. नुकतेच आदित्य ठाकरे यांना मूर्ख म्हणणारे निलेश राणे यांची स्वारी आता शिवसेनेकडे वळाली आहे. आता निलेश राणे यांनी शिवसेनेला मूळव्याधची औषधे घेण्याचा सल्ला दिलाय. निलेश राणे यांनी ट्विट करून “मूळव्याधची औषधे घ्या.. बरं वाटेल..” असा खोचक टोला शिवसेनेला लगावला आहे.