‘अगोदर ठाकरे कुटुंबावर बोललं तर शिवसैनिक चोपायचे, आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात’

uddhav-thackeray-nilesh-rane

मुंबई : ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

धरम मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ठक्कर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जून आणि जुलै महिन्यात फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने त्यांची तुलना मुघल राजशी केली होती. त्याने नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती.

‘तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्याचा भूतकाळ जाणून घ्या’, राष्ट्रवादीच्या नेत्याने तांबेंना सुनावलं

ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जहरी शब्दांत टीका केली आहे. ‘अगोदर ठाकरे कुटुंबावर कोण काय बोललं तर त्याला शोधायला शिवसैनिक जायचे आणि धरून चोपायचे पण यांचे आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात. पेंग्विन बोलला तर काय चुकलं??? पेंग्विन थंड गार हा पण थंड गार’. असा घणाघात राणे यांनी केला आहे.

दरम्यान, या वादग्रस्त ट्विटमध्ये समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असंही म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. समीत ठक्कर याच्यावर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. आतापर्यंत हा हॅशटॅग वापरून हजारो ट्वीट झाले आहेत.

नगरमध्ये लॉकडाऊन न केल्यास… सुजय विखेंचा थेट इशारा