या वयात दुसरं लग्न करून जयंत पाटलांनी खुप पावित्र्य राखलं-निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाला दिसेल त्याला पक्षात घेण्याची सवय लागली आहे. ज्यांनी नारायण राणे यांना विरोध केला, ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. तसेच विधानसभेत विरोधी पक्षात असतांना राणेंवर भ्रष्टाचारचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना पक्षात घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा मराठवाड्यातील सेलू तालुक्यात येवून पोहचली यादरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

NILESH RANE TWEET ON JAYANT PATIL
NILESH RANE TWEET ON JAYANT PATIL

आता जयंत पाटलांच्या या प्रश्नाला जेष्ठ राणेपुत्र निलेश राणे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिल आहे. ह्या वयात दुसरं लग्न करून जयंत पाटीलानी खुप पावित्र्य राखलं.. राष्टवादीवाल्यांना कुत्रा चावलाय वाट्ट.. भुंकत सुटले सगळीकडे.. कुठेही राणेच आठवतात. अशा अशायाचं ट्विट करून निलेश राणेंने जयंत पाटलांवर चांगलाच प्रहार केला आहे

पहा काय म्हणाले होते जयंत पाटील