Share

Nilesh Rane | “त्यांनीच मुलांना गेटबाहेर पाठवून…”; भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याबाबत निलेश राणेंचं मोठं वक्तव्यं

(Nilesh Rane) मुंबई : सत्तांतरानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. जाधवांवर झालेल्या या हल्ल्याबाबत निलेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. “भास्कर जाधव हा ढोंगी माणूस आहे. त्याने पोलीस संरक्षण वाढवण्यासाठी स्वत:चं हा हल्ला घडवून आणला असेल. त्यांच्या घरात रिकामटेकडे लोकं भरपूर आहेत. दोन्ही मुलं रिकामटेकडेच आहेत. त्यांच्या मुलांनाच गेटबाहेर पाठवून हा हल्ला घडवून आणला आहे” अशी टीका निलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.

निलेश राणे म्हणाले, “भास्कर जाधव यांनी स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी हे सगळं घडवून आणलं असणार. त्यांनी रात्री कुणालातरी स्वत:च्या कार्यकर्त्यांना असं करायला लावलं असेल. मुळात त्याच्याकडे स्वत:चे कार्यकर्तेच नाहीत. त्याने स्वत:च्या दोन मुलांनाच हे कृत्य करण्यास सांगितलं असेल. हा जो काही प्रकार घडला आहे, त्यानेच घडवला आहे, याला एवढं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. आम्हाला अर्थात कोकणातील लोकांना माहित आहे की, भास्कर जाधव हे बोगस व्यक्ती आहेत.

संडास, बाथरुमवर ठाकरेंचे फोटो

ठाकरे गटाचे नेते संडास बाथरूमवरही स्वःतचे फोटो लावतात. त्यांना त्यात मोठेपणा वाटतो. ते दुसऱ्यांच्या पैशांने स्टीकर लावतात. स्वःतच्या पैशांनी काहीच करीत नाही. मनपाच्या संडास-बाथरुमवर उद्धव ठाकरेंचेच फोटो आहेत. योगदान शुन्य पण आम्ही राजकारणात काही तरी करतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका राणेंनी केलीय.

महत्वाच्या बातम्या :

 

(Nilesh Rane) मुंबई : सत्तांतरानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now