Nilesh Rane | मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय झाला. मात्र, या निवडणूकीत नोटा दोन नंबरला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. यावरुन ठाकरे गटाने भाजप (BJP) पक्षावर सडकून टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कठोर शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघात केला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. यावेळी काही माणसंच नीच असतात, माणुसकी दाखवली तरी त्यांना आवडत नाही. बिनविरोध झाल्यासारखी ही निवडणूक होती तरीसुद्धा कष्टाने निवडणूक जिंकल्यासारखी भाषा उद्धव ठाकरे करतो. लायकी असेल तर मुलाला राजीनामा द्यायला सांग आणि मग बोल, असं त्यांनी म्हटलं आहे.
नोटाचा अर्थ निवडणुकीत एकही पक्ष पात्रतेचा नाही किंवा त्या निवडणुकीतील एकाही उमेदवाराला आपली सहमती नसेल तर नागरिकांसाठी नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. नागरीक नोटाचा पर्याय अवलंबून आपली भूमिका मांडू शकतात. अशातच जवळपास साडेबारा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाच्या पर्यायाचं बटन दाबलंय.
ऋतुजा यांना जवळपास 60 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलंय. पण जवळपास साडे 12 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाचं बटन दाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत फक्त 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केलं होतं. त्यापैकी साडेबारा हजार नागरिकांनी नोटाचं बटन दाबून मतदान केल्याने याबाबतची सध्या जोरदार चर्चा आहे.
यादरम्यान, ठाकरे गटाकडून भाजपवर आरोप केला जातोय. भाजपने नागरिकांना मतदानात नोटाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं होतं, असा आरोप केला जातोय. पण भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | कुठलंही विक्टीम कार्ड न ठेवता तुमचा माज मी उतरवेन ; सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
- Abdul Sattar | “सुप्रिया सुळे इतकी भिकाXXX झाली असेल तर…” अब्दुल सत्तारांची जीभ घसरली, थेट शिवीगाळ केली
- Eknath Shinde | तीन-साडेतीन महिन्यापूर्वी आम्ही महानाट्य केलं ; दामलेंच्या कार्यक्रमात शिंदेंची टोलेबाजी
- Aditya Thackeray | गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ आमदाराला आदित्य ठाकरेंनी मारली मिठी अन् म्हणाले…, ठाकरेंच्या मिठीची जोरदार चर्चा
- Raj Thackeray | “नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात” ; राज ठाकरेंची फटकेबाजी