Nilesh Rane | मुंबई : राज्यातील एअर टाटा बस प्रकल्प गुजरातला गेला. यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला होता. यावरुन भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे. तसं पाहता राणे आणि ठाकरे कुटुंब एकमेंकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
एका कंपनी बद्दल बारक्या ठाकरेची इतकी आदळ आपट चालली आहे पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार एक शब्द या विषयाबद्दल बोलले नाही. अजित पवार यांचे मागच्या पाच दिवसाचे ट्विट बघा तुम्हाला लक्षात येईल ठाकरेंना दोन्ही काँग्रेसने परत फाट्यावर मारलय, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. हा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. मात्र हा प्रकल्प महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यानंतर यावर आता पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू मांडली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.आपल्या राज्यातील जे उद्योग येऊ शकत होते ते आता निघून चालले आहेत. आम्हाला गाजर दाखवलं होतं की, वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रोजेक्ट राज्याला मिळणार आहे. आकड्यांच्या खेळात माहिर असलेल्यांनी पुन्हा हा खेळ केला आहे.
रायगडचा २० हजार कोटीचा पल्प आणि पेपर प्रकल्प आम्ही आणल्याचं त्यांनी सांगितलं. पण २३ मे २०२२ मध्ये आम्ही दावोसमध्ये असतानाच याचा एमओयू साईन झाला होता. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात आला होता. पण आता तो त्यांनी आम्ही आणल्याचं दाखवलं आहे. या सर्व कामांमध्ये त्यांनी क्रेडिट घेतलं आहे. आजवर मी कधीही इतकं खोटं बोललेलं ऐकलं नव्हतं. फडणवीस खोटं बोलतायत. फडणवीसांना जी माहिती मिळाली ती चुकीची आहे, असा गंभीर आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र थंडीची लाट, तर पुण्यात कमाल तापमानाची नोंद
- Breaking News | शिवसेना कोणाची? ४ आठवड्यानंतर होणार पुढील सुनावणी
- Shivsena | शिवसेना फूटीवर आज होणार निर्णय, पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी
- Bacchu Kadu | अमरावतीत बच्चू कडूंचा प्रहार मेळावा, मेळाव्यात ‘मै झुकेंगा नही’चे पोस्टर
- Uddhav Thackeray | “मोरबीचा पूल पडला, हि दुर्घटना एॅक्ट ऑफ फ्राॅड म्हणावी कि…?”, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींनाच सवाल