मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांनी (Chhatrapati Sambhaji Raje) पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील राजकारणात बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे. यावेळी भाजप आणि सत्ताधारी मविआने आपल्याला मदत करावी, अशी विनंतीही संभाजी राजेंनी केली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी त्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
“कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला?? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2022
दरम्यान सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही आमची उरलेली मतं राजेंना देऊ, असे म्हटले होते. यावरूनच राज्यातील राजकारणात अनेक बदलाव दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- …अखेर हार्दिक पटेलांचा राजीनामा, काँग्रेसचा सोडला हाथ!
- “मला वाटलं एक स्त्री म्हणुन सुप्रिया ताई ‘त्या’ वक्तव्याचा निषेध करतील, पण…”, अंजली दमानिया यांचा टोला
- केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
- निर्ढावलेलं सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय – सदाभाऊ खोत
- आदित्य ठाकरेंनी 3,520 कोटी घातले पाण्यात; आप’चा गंभीर आरोप