Share

Nilesh Lanke । “राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचेच, कोण होणार ते…”; निलेश लंकेंचं मोठं वक्तव्यं

Nilesh Lanke । मुंबई : दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच केला असल्याचं संगितलं. खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नाही आणि यामुळे त्यांची अगापाखड होत आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीला पुढील १५ वर्ष सत्तेत येवू देणार नाही, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

“राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असतील. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे.”, असं लंके माध्यमांशी बोलताना म्हणाले. राष्ट्रवादीकडून नेमकं कोण मुख्यमंत्री असेल? असं विचारताच निलेश लंकेंनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं म्हटलं आहे. “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवारातले सहकारी आहोत. परिवारातील ज्येष्ठाने एखादा निर्णय घेतला, तर तो आम्हाला सर्वांना मान्य असेल”, असं लंके म्हणाले आहेत.

राज्यातलं सरकार अल्पकालीन असल्याचा दावा विरोधक करत आहेत. महाविकास आघाडीचंच सरकार पुन्हा येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाविषयी दावा केला जात जातोय. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

दरम्यान, शंभुराज देसाईंच्या वक्तव्यावर मेहबूब शेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून पुढच्या वेळी शंभुराज देसाई आमदार होणार नाहीत. त्यामुळे शंभुराज यांचा नाईलाज झाला आहे. मी किती प्रामाणिक आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही. पण पाटणची परिस्थिती शंभुराज देसाईंना पुढच्या विधानसभेत कळेल. शंभुराज देसाईंचा देखील विजय शिवतारे होणार, असं मेहबूब शेख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Nilesh Lanke । मुंबई : दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics