‘पारनेरचा आमदार निलेश लंकेचं होणार’

स्वप्नील भालेराव /पारनेर : सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच स्तरातून नेतेमंडळींची जय्यत तयारी चालू आहे. नगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यातील राजकारण काहीसं रंजक पातळीवर पोहचलेलं दिसतंय. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी शिवसेना तालूका प्रमुख निलेश लंके हे थेट विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. निलेश लंके प्रतिष्ठान स्थापन करून गावोगावात प्रतिष्ठानची कार्यकारीणी बांधण्याच काम लंके सध्या करत आहेत.

लंकेंचा असणारा तालूका व जिल्हा पातळीवरील जनसंपर्क तसेच राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी असलेली जवळीक यामुळे लंके यांनी विधानसभाच लढवायची अशी कंबर कसलीय.दि. 6जानेवारी मुंबई येथे पारनेर येथील रहिवाशी असलेल्या कामोठ्यात लंकेंनी मेळावा घेवून. मोठ्ठ जनसमूदाय शक्तिप्रदर्शन केलं. यात त्यांनी तालूक्याला भेडसावणाऱ्या समस्या, पाणी प्रश्न, रस्ते विकास प्रश्न, वीजेचा प्रश्न , तरूणांचा रोजगाराच्या समस्या आदी प्रश्नावर भाष्य केले. ज्यांच्या हाती पारनेर तालुका आहे त्यांनी वरील समस्या का सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.अशा शब्दात समाचार घेतला.

आज लोकं माझ्या सोबत आहेत. ही जनता म्हणजे मी आहे. तालुक्यात जर विकासाची गंगा वहायची असेल तर ते आव्हान स्वीकारला मी तयार आहे कारण विधानसभा माझ्या साठी दूरची गोष्ट नाही. पारनेरचा आमदार निलेश लंकेचं होणार कारण समोर बसलेले मायबाप , तरूणवर्ग, तालुक्यातील तळागाळातील बांधव माझ्या सोबत आहेतअशा शब्दांत लंकेंनी कामोठ्याचा मेळावा गाजवला.

पूढील पंधरा दिवसात पारनेर मध्ये मोठं शक्तिप्रदर्शन होणार असून यात लंके अपक्ष लढणार की कोणत्या पक्षात जाणार हा निर्णय त्यांनी मात्र गुलदस्त्यात ठेवून सर्वच लोकांच्या मनात उत्सुकतेचा विषय आहे. लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त जाणार असल्याचे संकेतही सध्या लंके समर्थक वर्तवत आहे. यासर्व राजकीय घडामोडींवर सध्या पारनेर तालुक्यातील सर्वच लोकांचे लक्ष लागून राहीले आहे.

You might also like
Comments
Loading...