मुंबई: आज सभागृहात मांडलेल्या लक्षवेधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या मतदारसंघामध्ये वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे. या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वेगळ्याच लोकांच्या खात्यामध्ये रोख रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले आहे, असे त्यांनी सांगितले.
एकूण १ कोटी २२ लाख ४२ हजार ११७ रूपयांचा हा भ्रष्टाचार असून यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्री. देवखेडे व वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा भ्रष्टाचार केला असल्याचे समोर आले आहे, असे लंके यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<