निलेश लंके कोरोना केसरी ! हिंद केसरींनी चांदीची गदा देऊन केला सन्मान

nilesh lanke

पारनेर : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

निलेश लंके यांनी शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाळवणी (ता. पारनेर) येथील या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके स्वतः रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या या कार्याची दाखल जगभरात घेतली जात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव सुरोली (कराड) येथील हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. लंके यांना हिंद केसरी संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र देऊन कोरोना केसरी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आमदार लंके यांना कोरोना त्यांच्या कामाबद्दल कोरोना केसरी किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लंके यांचा अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. यासोबतच, काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP