निलंगेकरांचा विश्वासू बजरंग जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

shivsena

मुंबई: लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.लातुर जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य बजरंग जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला.

दरम्यान बजरंग जाधव हे भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू म्हणून परिचित होते. त्यामुळे निलंगेकर यांच्यासाठीही हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. बजरंग जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकप्रकारे बजरंग जाधव यांनी आता भाजपला मोठा धक्काच दिल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे शिवसेना पक्षात मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या