महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आ. डॉ. नीलम गोऱ्हेंंचा पुढाकार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षित राहाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी २६ जून २०१८ रोजी सकाळी महामंडळ मध्यवर्ती प्रशिक्षण हॉल, शंकरशेट रोड, स्वारगेट पुणे येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुसंवाद दिनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमामध्ये आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे, यांनी उपस्थित महिलांशी महिला सुरक्षितता या विषयांवर संवाद साधताना बसमध्ये महिलांवर प्रसंग ओढवल्यास सुरक्षेसाठी महिलांनी काय उपाययोजना करायला पाहिजे याबाबत केसस्टडी घेऊन या आ.नीलम गोर्हे यांच्या प्रश्नावर नीता पाटील, पल्लवी मापरेकर, ज्योती पवार, सुजाता जागडे व अन्य महिलांनी उत्स्फर्तपणे प्रतिक्रिया दिल्या.

स्त्रियांच्या या संघर्षशील भूमिकेमुळे मा.बाळासाहेब ठाकरे महिलांना रणरागिणी म्हणत असत असे सांगून आ. डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे, महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचं अनेक प्रश्न मार्गी लागत आहे. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे ते स्वागतार्ह असल्याचे सांगून या समितीमधील कामाची व्यवस्था कशी चालते हे सर्वसामान्यांनाही माहित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पीएमपीएल मधील महिलांना व पुरूषानांही पुरस्कार द्यावेत त्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल,तसेच यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्रामुळे २०० अल्पवयीन मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, आत्तापर्यंत ५ हजार कुटुंबांना स्त्री आधार केंद्राने आधार दिला. असे सांगत तुमच्यावरही कधीही कुठलाही प्रसंग ओढावल्यास स्त्री आधार केंद्राला कधीही हाक मारा तुमच्या पाठीशी सदैव हजर राहील असंही त्या म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी परिवहन मंडळाला बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची सूचना केली व त्यासाठी १० लक्ष रुपयाचा आमदार निधीही दिला. सीसीटिव्ही ज्या मार्गावर महिला उशिरापर्यंत प्रवास करतात अशा मार्गावर लावण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कार्यक्रमाला मा. मुक्ता टिळक, महापौर, पुणे महानगरपालिका, संयोजक मा. श्रीमती नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार गुरुजी, सावित्रीबाईं ची नाटिका सादर करणारी मेघना झुजम आणि मोठ्या संख्येने परिवहन काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.