fbpx

‘गड आला पण सिंह गेला’, आढळरावांच्या पराभवावर नीलम गोऱ्हेंची खंत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात भाजप आणि शिवसेनेनी दमदार कामगिरी करत केंद्रात पुन्हा सत्ता एकदा सत्ता स्थापन केली आहे. परंतु शिवसेनेला या निवडणुकीत शिरूरमधून पराभव स्वीकारावा लागला होता. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला होता.

याविषयी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ‘लोकसभा निवडणुकीत दिल्लीत सरकार आले. राज्यातही अनेक खासदार निवडून आले. मात्र, शिरूर लोकसभेत अपयश आहे. हे अपयश ‘गड आलापण सिंह गेला’ अशी भावना मनामध्ये निर्माण करून गेले आहे. तीनवेळा निवडणून आलेले खासदार आढळराव पाटील यावेळी निवडून आले नाही ही मोठी खंत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना गोऱ्हे यांनी आयसीआयसीआय सारख्या मोठ्या कंपनीने शेतकऱ्यांकडून पिक विम्याच्या नावाखाली पैसे घेतले आणि पिक विमा रक्‍कम दिली नाही. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असतानाही या कंपन्यांनी हात वर केले. मात्र, या प्रश्‍नासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा सुरू आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी पीक विम्याचा प्रश्‍न हाती घेतल्याने शेतकऱ्यांना मदत होणार आहे अस विधान केले आहे.