नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय शिवसेनेसाठी नगण्य – आ. निलम गोऱ्हे

Shiv Sena leader Nilam Gorhe

सोलापूर: नारायण राणे हा विषय आता शिवसेनेसाठी संपला आहे. राणे आणि शिवसेना यांचा कोणताही संबंध नाही. १० वर्षांपूर्वीच त्यांनी पक्ष सोडला असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय नगण्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. डॉ. गोऱ्हे यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचा सत्कार केला.

या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अस्मिता गायकवाड, शाहू शिंदे आदी उपस्थित होते.भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना सुरक्षित दर्शन घेता यावे. श्रद्धा आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये, हाच बाळासाहेबांचा विचार कायम आहे. पाणी, स्वच्छतागृह आणि भाविकांचे प्रश्न यावर मागील १७ वर्षांपासून मी काम करत आहे यापुढेही करत राहणार आहे. आजपर्यंत शिवसेना जनतेच्या हिताचे काम करीत आहे. भाजपबरोबर आम्ही सत्तेत असलो तरी चुकीच्या धोरणाला विरोध राहणारच आहे. शिवसेना नेहमी स्वत:च्या विचारधारेने चालत आलेला पक्ष असल्याने स्वतंत्र विचाराने वाटचाल राहणार असल्याचे आमदार गोऱ्हे म्हणाल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले