VIDEO: कठोर शिक्षेमुळे वाईट प्रवृत्तींवर जरब बसेल-नीलम गोऱ्हे

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी प्रकरणात न्यायालयाने तिन्ही नराधमांना सुनावलेल्या शिक्षेवर शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे समाधान व्यक्त केले. कठोर शिक्षेमुळे वाईट प्रवृत्तींवर जरब बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तिन्ही दोषींना सुनावलेल्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.