“ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो”

nikki-haley-having-romantic-affair-with-donald-trump-

टीम महाराष्ट्र देशा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझे अफेअर असल्याच्या चर्चा संतापजनक आहेत अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हॅली यांनी दिली आहे. याशिवाय ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो असा दावा देखील निकी हॅली यांनी केला आहे. मायकल वुल्फ यांनी ‘फायर अँड फ्युरी’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर निकी हॅली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या अफवांना उधाण आले आहे .

Nikki Haley

कोण आहेत निकी हॅली?

संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हॅली या मूळ भारतीय वंशाच्या आहेत.  मात्र एका मुलाखतीत निकी हॅली यांनी हे सगळे प्रकरण नाकारले आहे.निकी हॅली या ४६ वर्षांच्या आहेत २० वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत.

काय आहे प्रकरण ?

‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृ्त्त दिले आहे. ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये ज्या चार महिला आहेत त्यांच्यापैकी हॅली एक आहेत. तसेच ट्रम्प यांच्या त्या उत्तराधिकारी आहेत अशाही अफवा मध्यंतरीच्या काळात पसरल्या होत्या.त्यानंतर वुल्फ यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे त्यांचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र पॉलिटिको ला दिलेल्या मुलाखतीत निकी हॅली यांनी ट्रम्प यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे  नाकारले आहे.

काय म्हणाल्या निकी हॅली?

“मी एक यशस्वी स्त्री आहे. त्याचमुळे माझी हेतुपुरस्सर बदनामी करण्यात येते आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझे नाव जोडले जाते आहे. त्यांचे आणि माझे प्रेमसंबंध आहेत असे म्हटले जाते आहे. मात्र या गोष्टींना काहीही अर्थ नाही. पुस्तक लिहितानाच यातले संदर्भ चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. वुल्फ यांनी पुस्तकात रेखाटलेले प्रसंग प्रत्यक्षात घडलेले नाहीत.डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचा बराचसा खासगी वेळ निकी हॅलींसोबत घालवत’ असे एक वाक्य हे पुस्तकात आहे. मात्र या वाक्याला काहीही अर्थ नाही. आम्ही सोबत काम करत असताना अनेक कर्मचारी आमच्या आसपास असत त्यामुळे ट्रम्प यांच्याशी अफेअर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .काही पत्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझे आणि ट्रम्प यांचे नाते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चांगले नाही. मी माझ्या राजकीय भवितव्याबाबत कधीही ट्रम्प यांच्याशी चर्चा केलेली नाही तसेच कधीही ते आणि मी एकांतात नव्हतो. “