उज्वल निकम हे भ्रष्ट व्यवस्थेचे पाईक-निखील वागळे

nikhil wagle and ujwal nikam special story

टीम महाराष्ट्र देशा- उज्वल निकम हे भ्रष्ट व्यवस्थेचे पाईक आहेत तसेच जे सरकार असते त्यांच्याशी ते जमवून घेतात आणि विशेष सरकारी वकील बनतात असा गंभीर आरोप जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केला आहे.देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस काळा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती निकम यांच्या वक्तव्याचा वागळे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला.

‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना काय म्हणाले आहेत निखील वागळे?

“मला माहित नाही उज्वल निकम असे का म्हणालेत कि हा काळा दिवस आहे. उज्वल निकम हे हुशार वकील आहेत आणि राजकीय दृष्ट्या चाणाक्ष आहेत. जे सरकार असते त्यांच्याशी ते जमवून घेतात आणि विशेष सरकारी वकील बनतात. त्यांना हा काळा दिवस का वाटला माहित नाही, माझ्या दुर्ष्टीने तर हा भारतीय  लोकशाहीच्या वाटचालीतला अत्यंत महत्वाचा आणि निर्भय असा क्षण आहे. सुप्रीम कोर्टातले चार न्यायाधीश बाहेर पडतात आणि पत्रकार परिषद घेतात आणि थेट मुख्य न्यायाधीशांना वर आरोप करून त्यांना सांगतात कि तुम्ही सुधारले पाहिजे. माझ्या दुर्ष्टीने, लोकशाही च्या दुर्ष्टीने स्वागतार्ह घटना आहे. वकील काळा कोट घालतात तसेच उज्वल निकम हि काळा कोट घालतात पण त्यांना काळा दिवस का वाटला माहित नाही. कदाचित सत्ताधारी अडचणीत येणार असल्यामुळे उज्वल निकम असे म्हणाले का ? हे मला माहित नाही ? पण निकम जी च्या हेतू बद्दल मी शंका घेणार नाही, ते खूप  चाणाक्ष वकील आहेत. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक विधान केले असेल असे मी मानतो. “

उज्वल निकम म्हणतात ‘ काळा दिवस ‘ ‘ कलंक ‘ …! मला कळत नाही त्यांच्या बुद्धीला कलंक लागलाय का ? याच स्वागतच केले पाहिजे. उज्वल निकम यांचे राजकीय हेतू असतील तर ते मला माहित नाही, असतील तर ते बाहेर यायला हवे. आणि मी आज ते सत्य बोलणार नाही आहे. पण उज्वल निकम यांच्या विषयी काही गोष्टी सत्य आहेत, त्यांचे राजकारण्याशी असलेले संबंध त्यांचाकडे ज्या केसेस गेल्या त्यात अनुकूल निकाल लागतात पण खैरलांजी च्या केस मध्ये काय झाल ?, उज्वल निकम यांनी काय केल?. तेव्हा उज्वल निकम आपण फार ज्ञानी आहोत म्हणून वावरत असतील तर, त्यांचेही हात दगडाखाली आहे हे त्यांनी समजून घ्यावे. योग्य वेळी त्या बद्दल बोलता येईल.

पुढे बोलताना ते असे म्हणाले कि ‘ या चार न्यायमूर्तीचे निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. त्यांनी बंडाचा झेंडा वर केलेला आहे आणि या बंडच्या झेंडाला सर्व जनतेने पाठींबा दिला पाहिजे. हे अपवादत्मक बंड आहे.अपवादत्मक बंड तेव्हाच केले जात जेव्हा परिस्तिथी हाताबाहेर गेलेली असते. जेव्हा सरकारी अधिकारी हि भ्रष्टाचार विरुद्ध बोलतात तेव्हा असे म्हंटले जाते त्यांनी या विषयी बोलू नये. पण मला असे वाटते ज्याला ज्याला भ्रष्टाचारा  विरुद्ध आवाज उठवायचा असेल त्यांनी व्यवस्था म्हणून प्रयत्न करावेत. जर ते प्रयत्न यशवी झाले नाही तर त्यांनी बाहेर येऊन आवाज उठवला पाहिजे. कारण जनता हि सार्वोभोम आहे. सर्व नियम बाजूला ठेवून सत्य सांगण्याची जबाबदारी आहे, सत्याला पर्याय नाही. सत्य हे बोललेच पाहिजे. आणि हे चार न्यायमूर्ती बोलले त्याच मोकळ्या मनाने स्वागतच करयला हवं.

काय म्हणाले होते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम – 

आजचा दिवस हा न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ठरला आहे. अशा प्रकारे पत्रकार परिषद घेतल्याने नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेकडे साशंक नजरेने बघेल. त्यामुळे न्यायमूर्तींनी दुसरा मार्ग अवलंबला पाहिजे होता. हा न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. आज न्यायमूर्तींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे पुढील न्यायदानावेळी गंभीर परिणाम दिसतील. यापुढे प्रत्येक सामान्य नागरिक न्यायालयाच्या निर्देशाकडे साशंक नजरेने पाहील. प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केला जाईल, अशी भीती निकम यांनी यावेळी व्यक्त केली.

काय आहे नक्की प्रकरण?

लोकशाही असलेल्या देशात यापूर्वी कधीही घडली नसेल अशी घटना आज घडली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना एक पत्र दिले आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्यरित्या काम करत नसल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून देशाच्या न्यायव्यवस्थेत सुरू असलेल्या घटना पाहाता न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याचं या पत्रात म्हटल्याचे न्या. चेलमेश्वर , रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ स्वतंत्र यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

आज सकाळी आम्ही सरन्यायाधीशांची भेट घेतली आहे. त्यांना आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालय प्रशासन योग्यरित्या काम करत नाही. ढिसाळपणा सुरू आहे. हे सांगूनही सरन्यायाधीशांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अखेर आम्ही आमची भूमिका देशासमोर मांडायची ठरवली. कारण आपल्या देशात न्यायव्यवस्था ही स्वतंत्र व्यवस्था आहे. पण तिचे स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. सशक्त लोकशाहीसाठी गैरप्ररकारांविरोधात आवाज उठवणं आमचं कर्तव्य समजून आम्ही तुमच्या समोर आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच सरन्यायाधीशांकडे दिलेल्या पत्राची कॉपी देखली त्यांनी पत्रकारांना दिली.