मुंबई : काल म्हणजेच सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याविषयी निर्णय जाहीर केला. त्यामध्ये ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच आयोगाच्या या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी यावर भाष्य करत एकनाथ शिंदे गटावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले निखिल वागळे ?
निवडणूक आयोगाने शिंदे टोळीला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्याची परवानगी दिली आहे काय?, असा खोचक सवाल निखिल वागळे यांनी एकनाथ शिंदे गटाला केला आहे. यासंदर्भात निखिल वागळेंनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.
तसेच, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं नाव देण्यात आलं आहे. त्यावरही निखिल वागळेंनी आपली प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदेगटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नावं देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय वादग्रस्त आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटो सोबतच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu Patil | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर शहाजीबापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Sanjay Raut | निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले…
- Shivsena । शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य एकनाथ शिंदे या गारद्याने केले; शिवसेनेचे टीकास्त्र
- Anil Parab | धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांचा विरोधकांना इशारा
- Shivsena । येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल