नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन निरुपयोगी; कडक लॉकडाऊन लावण्याचीच गरज : डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली आहे.  रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात लवकरच तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोना रोखण्यासाठी गरजेच्या असलेल्या उपायउपजनांवर सविस्तर भाष्य केलं आहे.

‘फक्त रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर भर देऊन चालणार नाही, तर रुग्णसंख्या कमी करण्यावरही लक्ष द्यावं लागेल. वीकेंड लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लागू करणं निरर्थक आहे. जर आपण लॉकडाऊन लागू करण्याबद्दल म्हणाल, तर तो पुरेशा कालावधीसाठी असला पाहिजे. कमीत कमी दोन आठवड्यांसाठी तरी असावा. हा लॉकडाऊन कडकडीतअसणे गरजेचे आहे. जर रुग्णसंख्या लवकर घटली, तर आपण तो लवकरही उठवू शकतो,’ असं डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या