प्रियांका- निकचा क्वारंटाईन मध्येही रोमान्स,’तो’ व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

बॉलीवुड सेलिब्रिटी सध्या घरात क्वालिटी टाईम देताना दिसत आहेत. बॉलिवुड स्टार प्रियांका चोपडादेखील सध्या आपल्या पती सोबत अमेरिकेत आहे. प्रियांका आणि निक जोनस दोघेही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. प्रियांका आणि निकचा यादरम्यान एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. जो भरपूर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियांका आणि निक कोणासोबत तरी व्हिडीओ चॅट करत होतो. हा व्हिडीओ चॅट संपत असताना प्रियांका आणि निक एकमेकांसोबत किस करताना दिसत आहेत. निक-प्रियंकाचा किसवाला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियांका-निक अमेरिकेत त्यांच्या घरात आहेत. प्रियांकाने ब्राऊन सूट तर निकने ब्लू हुडी शर्ट घातलेला आहे. दोघांच्याही हातात ड्रिंकचे ग्लास आहेत. जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातलेला असताना हे कपल रोमँटिक झालेले दिसत आहेत.