एल्गार परिषदेबाबतचा तपास एन.आय.ए.कडे

blank

टीम महाराष्ट्र देशा – शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करावी अशी मागणी करणारे पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. परंतु आता केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. कडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे.

दोन वर्षापूर्वी झालेल्या कोरेगाव भीमा येथील दंगली प्रकरणी झालेल्या तपासावर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. बुद्धीजीवी लोकांना मुद्दाम या प्रकरणात गोवण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

आता केंद्रातील भाजप सरकारने हा तपास स्वताहून एन.आय.ए.कडे दिला आहे. याद्वारे केंद्रातील भाजप सरकारने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर कुरघोडी केली आहे.