एन.आय.ए.ही संस्था भाजपची नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी घाबरण्याचे कारण नाही : विनोद तावडे

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करावी अशी मागणी करणारे पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. परंतु आता केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. कडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे.यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते हा तपास एन. आय. ए. कडे सोपवणे म्हणजे राज्यावर अविश्वास दाखवणे होय ; यालाच उत्तर देतांना माजी मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे की ती तपास यंत्रणा भाजपची नाही त्यामुळे तपास हा योग्य रितीने होईल म्हणून प्रकाश आंबेडकरांनी लगेच घाबरून जाऊ नये.

एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या प्रकरणाचा आढावा राज्य सरकारकडून घेतला जात असताना केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

Loading...

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवला. त्यामुळे या प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

याचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात येत असताना केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास एएनआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी सरकारनं शरद पवारांवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार