दलित अत्याचाराविरोधात राहुल गांधींचंं आजपासून ‘संविधान बचाव’ अभियान

टीम महाराष्ट्र देशा : दलितांवर होणारे हल्ले आणि घटनेवरही होणारे तथाकथित हल्ले याविरोधात काँग्रेस अध्यक्ष आज त्यांच्या पक्षातर्फे संविधान बचाव अभियानाचं उद्घाटन करणार आहेत. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये त्यांचं भाषण होईल. या कार्यक्रमाला डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.