Share

Breaking News | शिवसेना कोणाची? ४ आठवड्यानंतर होणार पुढील सुनावणी

Breaking News | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात पडलेल्या फूटवर आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आज होणार नसून ४ आठवड्यानंतर या सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे (Breaking News). त्यामुळे २९ तारखेला निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने होणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), हे पाहणं महत्वाचं राहिल.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला आव्हान दिले आहे. मात्र आता लेखी युक्तिवाद आणि कागदपत्रे सादर करण्याचे दोन्ही गटांना कोर्टाने आदेश दिले आहेत.

दरम्यान, प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला विरोध केला आहे. या विविध मुद्दय़ांवरील पाच-सहा याचिकांवर घटनापीठापुढे मंगळवारी म्हणजेच आज सुनावणी होणार होती.

अपात्रतेच्या याचिका जर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविल्या गेल्या, तर त्यावर निर्णय होण्याआधी अन्य याचिकांवर सुनावणी होण्याची फारशी शक्यता नव्हती. त्यामुळे या याचिकांवर अध्यक्षांकडे सुनावणी व्हावी, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात येणार होता. या मुद्दय़ांवर घटनापीठ कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच कोर्टाने आजची सुनावणी रद्द करत नवीन तारीख दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Breaking News | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात पडलेल्या फूटवर आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now