पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळुदे बाबा!; हेमंत ढोमे रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागला

मुंबई : पावसाळा आला की रस्त्यांचे मोठे नुकसान होत असते. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडतात. त्यात पाणी साचते वाहन चालकाला खड्ड्यांचा अंदाज आला नाही की, अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते आणि स्थानिक नागरिक प्रशासनानला धारेवर धरत असतात. मात्र या अभिनेत्याने प्रशासनाआधी कॅान्ट्रॅक्टरला धारेवर धरलं आहे. अभिनेता हेमंत ढोमेने रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रसासनाआधी कॉन्ट्रॅक्टरला धारेवर धरलं आहे.

अतिशय प्रामाणिकपणे सांगतो… पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सग्गळे नंतर! खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल, असं म्हणत हेमंतने कॉन्ट्रॅक्टरला खोचक टोला लगावला आहे. कॉन्ट्रॅक्टरला कोणी बदलू शकत नाही! ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात! पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा!, असं हेमंत ढोमे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.

दरम्यान, हेमंतच्या ट्वीटला रिप्लाय करत एकाने कॉन्ट्रॅक्टरसाठी ट्रेंड करण्याचे सुचवले. त्यावर हेमंंतने लगेच उत्तर देत #कॅान्ट्रॅक्टर_विकास_आहे, असा हॅशटॅगही सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या