fbpx

पुढच्या तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

पुढील तीन दिवस मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्याच्या बऱ्याच भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे १९ जुलै ते २१ जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावनार आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला असला तरी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अजिबातच पाऊस झालेला नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना अद्याप पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.