उद्धव ठाकरे आता फडशाच पाडणार, फडणवीस कार्यकाळातील मागविल्या ‘त्या’ सहा फाईल

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक म्ह्ह्तावाच्या निर्णयाचा धडाकाच लावला आहे. पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे ‘अॅक्शन’मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. सुरवातीलाच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई मेट्रोच्या आरे जंगलातील कारशेडला स्थगिती दिली. यानंतर आता त्यांनी फडणवीस सरकारने शेवटच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फाईल्स मागवल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

एकीकडे विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन संपताच त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत असल्याचं सांगत श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले. दुसरीकडे फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात अखेरच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय बारकाईने तपासला जाणार आहे. त्यामुळे अनेकांना धडकी भरल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या सहा फाईल्ससोबतच उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागातील विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या सर्व फाईल्स मागविल्या आहे. त्यामुळे फडणवीस कार्यकाळातील अनेक निर्णयावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचंही काम सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा फोडण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...