महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी : छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई : राज्य विधीमंडळ अधिवेशनाचा आज (ता. २८) पाचवा दिवस आहे. आज विधानसभेत बोलताना राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी केली आहे. ‘१९३१ साली जर अपुऱ्या साधनसामग्रीसोबतही होऊ शकत असेल, तर आता का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ‘ जनगणनेच्या फॉर्ममध्ये अनेक कॉलम आहेत. फक्त शेवटी एक ओबीसीचा कॉलम वाढवला, तर हे होऊ शकेल. देशात जसे एससी, एसटी आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सोयी-सुविधा आणि आरक्षण मिळतं, त्याप्रमाणे ओबीसींना देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा मिळाव्यात, त्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी संवाद साधून योग्य ती कार्यवाही करावी’, असं देखील ते म्हणाले.

Loading...

तर ‘विरोधी पक्षांदेखील ओबीसी जनगणनेला समर्थन दिलं आहे. आमच्या काळात गोपीनाथ मुंडेंनी देखील ही मागणी केली होती. आमचा या मागणीला पाठिंबाच आहे. हा मुद्दा धोरणात्मक आहे. योगायोग म्हणजे देशाचे पंतप्रधान देखील ओबीसी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय, आम्ही असं सगळ्यांनी पंतप्रधानांकडे जाऊन यासाठी विनंती करायला हवी’, अशी भूमिका यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात