कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही जागा महायुतीच जिंकेल- चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे उमेदवार  चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील निवडणूक एफतर्फी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही जागा महायुतीच जिंकणार विश्वास व्यक्त केला आहे. ते कोल्हापूरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, कोथरूडमध्ये निवडणूक एकतर्फी झाली आहे. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आमचा ‘अब की बार 220 पार असा’ नारा होता. आता ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. आम्ही म्हणतो ‘अब की बार 220 पार नहीं 250 टच’. कोथरूडमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. एक लाख साठ हजार मताधिक्याने माझा विजय निश्चित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि संयमी आहेत. कुठलीही आव्हाने आली तरी ते विचलित होत नाहीत. फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील. 1 कोटी 70 लाख लोक असे आहेत की, ज्यांना सरकारकडून काही ना काही लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते नतद्रष्ट नाहीत. आपला कोणी मित्र उभा आहे म्हणून ते भाजप-शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत. मी आणि मुख्यमंत्र्यांनी परळीतील या प्रकाराबाबत निषेधाचे संयुक्त पत्रक काढले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान , विधानसभा निवडणुकीसाठी काल ( सोमवारी ) मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. आता सर्वांचे लक्ष २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. त्यामुळे या निकालात महायुती का महाआघाडी बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्यांचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या