नौकरी गेल्याच्या नैराश्यातून वृत्तपत्र ऑपरेटरची आत्महत्या

औरंगाबाद : शहरातील नामांकित वृत्तपत्र कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करणा-या ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मजहर बाबर शेख, रा. हिलाल कॉलनी, औरंगाबाद असे तरुण ऑपरेटरचे नाव असून त्याने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

घराच्या खोलीत असलेला मजहर घराबाहेर आला नाही, त्याला पाहण्यासाठी घरातले गेले असता. त्याने त्याने ओढणीने गळफास घेतल्याची माहिती घरच्यांना कळाली त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपूरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मजहरने शहरातील तीन ते चार दैनिकात ऑपरेटर म्हणून काम केले आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात नामांकित वृत्तपत्र कार्यालयातील नोकरी गेल्याने तो माणसिक तनावात होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहे. त्याची नमाजे जनाजा जामा स्मस्जित येथे बाद नमाज असर अदा केली जाईल. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP