शिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याची केलेली घोषणा फसवी ठरणार ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासनांची खैरात केली आहे. शिवाय एक रुपयात आरोग्य तपासणी, १० रुपयांत जेवणाची थाळी अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एका फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सामान्य जनतेसाठी अशा अनेक योजनांच्या घोषणा आधी केल्या जातात आणि नंतर त्या योजनांचा बोजवारा उडतो, हा इतिहास आहे. याआधीही २ रूपयांत झुणका-भाकर देण्याचे आश्वासन सेनेने दिले होते, त्याचे काय झाले? १० रूपयांत शिववडा देण्याचे आश्वासनही असेच खोटे ठरले. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी शिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याची घोषणा केली आहे खरी… पण ही पण निवडणुकीची फसवी घोषणाच ठरणार की काय हा प्रश्न आहे…असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातून पाडला.

महत्वाच्या बातम्या