fbpx

हल्लाबोल आंदोलनातून सरकारचा नाकर्तेपणा समोर आणु

नेवासा / भागवत दाभाडे : हल्लाबोल आंदोलनातून सरकारचा नाकर्तेपणा समोर आणू असे प्रतीपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केले आहे. पाथर्डी तालुकास्तरावर करण्यात येणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनार्थ पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष घुले बोलत होते.

पाथर्डी तालुक्यात अनेक संस्था ताब्यात असूनही भाजपकडे विकासाचा निश्चित अजेंडा नाही, कर्जमाफीचा भुलभुलैय्या सुरूच आहे, वीजच नाही तर ऑनलाइन फॉर्म कसे भरायचे असा सवालही चंद्रशेखर घुले पाटील यांनी उपस्थित केला.जनसुविधा अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण जिल्हाध्यक्ष घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे म्हणाले की, लोकसभेला कोण व विधानसभेला कोण या साठी आता भाऊंना व मला चर्चा करावी लागेल, मी कोठेही लढायला तयार आहे असे संकेत प्रताप काका ढाकणे यांनी दिले.बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, महेश बोरुडे,विष्णू सातपुते, बाळासाहेब घुले ,बंडोपंत घुले,गोरक्षनाथ सातपुते आदी उपस्थित