भर सभेत पंकजा मुंडे व्यासपीठावर कोसळल्या, तातडीने रुग्णालयात केले दाखल

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या आणि परळी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे या भाषण करतानाचं स्टेजवर कोसळल्या आहेत. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी सांगता सभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थिताना संबोधित करतानाचं पंकजा मुंडे कोसळल्या. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबत होते. चक्कर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पंकजा यांना कोणताही गंभीर आजार नाही. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.

पंकजा मुंडे केवळ नाश्ता करुन बाहेर पडल्या होत्या. त्यांनी दिवसभर जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत होत्या. मुंबई, पुणेसह नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या