हागणदारीमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महापालिकेचे अणखी एक पाऊल

पुणे-: प्रगतीशील समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो येऊ घातली तरी शहर अद्याप हागणदारी मुक्त झाल्याचे चित्र दिसत नाही. महापालिका प्रशासनापुढे हे मोठे आव्हान आहे. कारण या गोष्टीमुळेच यंदाचा स्वच्छ भारत पुरस्कारालाही शहराला मुकावे लागले. यासाठी प्रशासनाने आता शहरात काही ठिकाणी तात्पूर्ती शैचालये म्हणजे पोर्टेबल शौचालये बसवून त्याद्वारे नागरिकांना शौचालय वापराची सवय लावण्यसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

यासाठी महापालिकेच्या ६ क्षेत्रीय कार्यागत ५२ ठिकाणी २४४ शौचालये भाडे तत्वार ठेवण्यात आली आहेत. झोपडपट्ट्या, रस्ते, रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा, मोकळ्या जागा अशा सर्वाजनिक ठिकाणी ही शौचालये बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ङ्कअङ्क क्षेत्रीय कार्यालयात ५०, ‘बङ्क मध्ये ह्न ४४, ‘कङ्क मध्ये ह्न ६५, ‘ईङ्क मध्ये ह्न ४५ आणि ‘फङ्क क्षेत्रीय कार्यालयात अशी ४० अशी या शौचलयांची उभारणी करण्यात येणार आहे.

सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, यामुळे महिलांनाही सार्वजनिक ठिकाणी शौचालये उपलब्ध होईल तसेच नागरिकांना मुळात शौचालय वापरण्याची सवय लागावी यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्यानंतर पुढील उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असेही गावडे यांनी सांगितले. महापालिका राबवत असलेल्या या उपक्रमाला आता नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे. तरच शहर हागणदारीमुक्त होऊ शकेल

You might also like
Comments
Loading...