ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक, शेतकऱ्यांच्या मुलांची माफी मागतो – तुपकर

टीम महाराष्ट्र देशा: स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडण्याचा निर्णय म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. ह्या निर्णयामुळे झालेल्या त्रासबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांची माफी मागतो, असं म्हणत रविकांत तुपकर यांनी घर वापसी केली आहे. १८ दिवसांपूर्वी संघटनेतील अंतर्गत वादाला कंटाळून तुपकर यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली होती. मात्र आता आपली चूक कळल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.

राजू शेट्टी यांचे विश्वासू म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षापासून शेट्टी व तुपकर यांनी शेतकरयांच्या प्रश्नावर तत्कालीन सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, तुपकर यांनी अचानक सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत तडकाफडकी प्रवेश केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. दरम्यान, केवळ १८ दिवसांमध्ये त्यांनी घर वापसी केली आहे.

कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थित रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी संघटनेत प्रवेश झाला. यावेळी बोलताना तुपकर म्हणाले कि, माझ्या भूमिकेमुळे सर्वाना धक्का बसला होता. मी हा निर्णय अत्यंत कमी कालावधीमध्ये बदलला आहे. गेली १६ वर्षापासून मी चळवळीत काम करत आहे. संघटनेत काम करत असताना अनेक संकट आली त्यांच्या आम्ही सामना केला. संघटनेतील अंतर्गत वादामुळे मी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. १५ दिवसांपासून मला झोप येत नव्हती. राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी भेट घेत मला निर्णय बदलण्याबाबात सूचना केली होती.

राजू शेट्टी आणि माझा संवाद कधीही तुटला नाही. प्रवेशाचा निर्णय घेतल्यावरही आम्ही बोलत होतो. लोक आपल्याला किती प्रेम करतात हे मला राजीनामा दिल्यावर समजलं. संघटना सोडल्यावर कोणीही माझ्यावर टीका केली नाही. आता भविष्य काळामध्ये कोणत्याही पदावर संधी मिळाली नाही, तरी संघटना सोडणार नाही, असं तुपकर यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या