पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौड’

पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबरच सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिले.राष्ट्रीय एकता दिन आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्ये काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित एकता दौड दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पुण्यातील विधानभवन येथे सुरु होऊन पुन्हा याच ठिकाणी संपेल. साधारणपणे दोन किलोमीटर अंतराची ही दौड असेल. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी शाळांचे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटना व क्रीडा मंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

You might also like
Comments
Loading...