fbpx

कॉंग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरांच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे अश्लील नृत्य

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून निंदनीय वर्तन घडले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनी अश्लील नृत्य केले आहे.तर याबाबत उर्मिला मातोंडकर यांनी पोलिसात तक्रार केली असून संरक्षणाचीही मागणी केली आहे.

उत्तर मुंबई येथील कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या आज सकाळी मतदार संघात प्रचार करत होत्या. त्यावेळी ८- १० भाजप कार्यकर्त्यांनी उर्मिला यांच्या प्रचारात आडथळा आणत अश्लील नृत्य केले आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी हाणामारी केली.मात्र या साऱ्या प्रकारात एक महिला प्रवासी जखमी झाली. या साऱ्या प्रकारामुळे परिसरात भाजप कार्यकर्त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस कडून उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात आले आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने गोपाल शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारामध्ये भाजप कार्यकर्ते गलीच्छ वर्तन करताना दिसत आहेत.