महाराष्ट्र हदरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 15 जानेवारीला

sonai hatyakand

अहमदनगर : सहा वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित नेवासा तालुक्यातील सोनई येथे प्रेमप्रकरणातून दलित समाजातील तीन युवकांचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याच्या प्रकरणाची सुनावणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली असून 15 जानेवारी रोजी आरोपींच्या दोषसिध्दीबाबत तसेच शिक्षेबाबत सुनावणी होऊन आरोपींना त्याच दिवशी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

मेहेतर समाजातील तीन युवकांचा खून करण्याची घटना सोनई जवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे 1 जानेवारी 2013 रोजी घडली होती.सचिन सोहनलाल घारू(वय 23),संदीप राजू धनवार(वय 24)व राहुल कंडारे(वय 26,तिघे राहाणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) अशी खून झालेल्या तीन युवकांची नावे आहेत.या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले,रमेश विश्वनाथ दरंदले,पोपट विश्वनाथ दरंदले,गणेश पोपट दरंदले,अशोक रोहिदास फलके,अशोक नवगिरे,संदीप कुर्हे या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे.

Loading...

नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेमध्ये सचिन घारू,संदीप धनवार व राहुल कंडारे हे तीन युवक सफाई कामगार म्हणून कामाला होते.सोनईच्या गणेशवाडी परिसरातील एका सवर्ण वर्गातील मुलीबरोबर सचिन घारू याचे प्रेम संबंध होते.या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या घरच्या लोकांना समजली होती.त्यांचा या प्रेमसंबंधला तीव्र विरोध होता.त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी घरातील स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे,असे सांगून 1 जानेवारी 2013 रोजी घरी बोलावले होते.त्यावेळी आरोपींनी सचिन घारू याचा खून करून आडकित्याने त्याच्या शरिराचे तुकडे तुकडे करून जवळच असलेल्या एका कूपनलिकेत टाकले होते.तसेच संदीप धनवार व राहुल कंडारे या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले याच्या कोरड्या विहिरीत पुरूल टाकले होते.वास्तविक पणे या खून प्रकरणात दरंदले यांच्या कुटुंबातील महिलांचा देखील समावेश असल्याचा आरोप मृत सचिन घारू याच्या आईने केली होती.मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी ही तक्रारच रेकॉर्डवर घेतली नाही.असा आरोप नातेवाईकांनी केला होता.

या प्रकरणाच्या तपासाबाबत राजकीय हस्तक्षेपामुळे तपासा बाबत पोलिसांची भूमिका संशयाच्या घे-यात होती. पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्युचा व तीन दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.खुनाच्या घटनेनंतर तब्बल 5 दिवसांनी पोलिसांनी दलित अत्याचार विरोधी कायद्यानुसार(अॅट्रासिटी) गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे दलित संघटनांनी पोलिसांच्या तपासाविषयी शंका घेतल्याने अखेरीस हा या तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.एकूणच या प्रकरणात साक्षीपुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने प्रकरणाची सुनावणी नाशिक अथवा जळगाव जिल्ह्यात करावी अशी विनंती करणारी याचिका मृताच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.सुनावणी नंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात करण्याचा आदेश दिला होता.

सरकारच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली होती.गेल्या काही काळापासून सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांच्या न्यायालयात सुरू आहे.सरकारच्या वतीने अॅड.उज्ज्वल निकम व आरोपींच्या वतीने अॅड.रविंद्र चौधरी,अॅड.अविनाश भिडे व अॅड. कासलीवाल यांनी बाजू मांडली आहे.या प्रकरणात सरकारच्या वतीने एकूण 51 साक्षीदार तपासण्यात आले.त्यापैकी सचिन घारू याचे ज्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते त्या मुलीची साक्ष महत्वाची होती.मात्र न्यायालयात सुनावणी च्या वेळी सरतपासणी व उलट तपासणी दरम्यान ही मुलगी काहीच बोलली नाही.त्यामुळे तिला फितुर साक्षीदार घोषित करण्यात आले आहे.न्यायालयात सरकार पक्ष व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद नुकताच पूर्ण झाला असून 15 जानेवारी रोजी सुनावणी दरम्यान आरोपींच्या दोषसिध्दीबाबत व शिक्षेबाबत दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद होणार असून त्याचदिवशी या तिहेरी हत्याकांडाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....