पुण्यातील ढोल पथकांवर ध्वनी प्रदूषणामुळे घातले निर्बंध

टीम महाराष्ट्र देशा : सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील अनेक ढोल ताशे पथक सज्ज झाले आहेत. मात्र गणेशोत्सवात होणारं ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांकडून ढोल-ताशा पथकात आता लोखंडी प्लेट वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच एका पथकाला जास्तीत जास्त 40 ढोल, 10 ताशा, 6 झाँज आणि केवळ 100 सदस्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांच्या या निर्बंधांमुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात गणेशोत्सवात गणपतीसमोर ढोल ताशांच्या भव्य मिरवणुका निघतात. या मिरवणुका म्हणजे पुणेकरांची प्रतिष्ठा आहे. मात्र आता याच मिरवणूकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनीप्रदुषणाचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याच सांगितल जात आहे.