fbpx

आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील लैंगिक शोषणाची माहिती मुनगंटीवारांनी दडवली ?

टीम महाराष्ट्र देशा : राजुरा येथील एका खासगी आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चर्चेत आले होते. तर आता काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगालिया यांनी मुनगंटीवार यांना राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील मुलींचे होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती होत, असा धक्कादायक आरोप केला आहे.

यावेळी नरेश पुगालिया म्हणाले की, राजुरा येथील एका खासगी आदिवासी मुलींच्या वसतिगृहात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची माहिती पालकमंत्री म्हणून मुनगंटीवारांना होती. या दरम्यान लोकसभेची निवडणूक होती. त्यामुळे हे प्रकरण समोर आले तर कारवाई करण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून आपल्यावर येऊ शकते. याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. या भीतीने १३ एप्रिलपर्यंत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पुगालिया यांनी केला आहे.